एक विठ्ठलचिंतन । आणि
2033.
एक विठ्ठलचिंतन । आणिक दुजे नेघे मन । ऐसे घडता साधन । जोडे सर्व तयासी ॥१॥
हेचि एकविधा भक्ति । येणे जोडे सर्व मुक्ति । पर्वकळ विश्रांति । तेथे घेती सर्वदा ॥२॥
तीर्थ ओढवती माथा । वंदिताती सर्वथा । तपांच्या चळथा । घडताती आपेआप ॥३॥
घडतें यज्ञाचें पुण्य । आणिक तया नाही बंधन । शरण एका जनार्दन । निश्चय ऐसा जयाचा ॥४॥
