गुरुराव गुण गंभीरवो
2052.
गुरुराव गुण गंभीरवो वावो चैतन्य प्रकाश |योगी सहज सुकामिनी विलासु ॥ धृ० ॥
चिदानंदघनु तंनु सांवळावो हरि पाहता निवती लोचन |तनुमन चरणी वो गुंतली नाम गोपाळाचे अमृत. समान ॥१॥
पितांबरदेला मालगंठी या रावो गोपाळा |मुगुटी झळाळ सर्वांगी कस्तुरीचे विलेपन कटी रुळे वनमाळा ॥२॥
|येणेंचि जन्मे पाविजे गोपाळाशी आनु नाही सार |श्रीवत्सलांछन हेचि खूण विष्णुदास नामया दातार ॥३॥
