गाऊ तरी एक विठ्ठलाचि
2048.
गाऊ तरी एक विठ्ठलाचि गाऊ । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥
पाहू तरी एक विठ्ठलचि पाहू । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥
आठवुं तो एक विठ्ठल आठवुं । आणिक न सांठवुं हृदयामाजीं ॥३॥
विठ्ठलावांचुनीं मनी नाही आन । सर्वभावे प्रमाण विठ्ठल मज ॥४॥
एका जनार्दनी जडला जिव्हारीं । विठ्ठल चराचरी व्यापुनि ठेला ॥५॥
