लाडिके विठोबाचे आम्ह
2046.
लाडिके विठोबाचे आम्ही । गाऊ नित्यनेमीं नाम तुझे ॥१॥
उत्तम उत्तम साधन हे नाम । गांता प्रेम वाटे जीवी ॥२॥
न कळेचि वेदा उपनिषद्बोधा । त्या हरि गोविंदा लगे आम्ही ॥३॥
एका जनार्दनी मंगळा मंगळ । न लगे आम्हा मोल उच्चारिता ॥४॥