वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

भाग्यवंत म्हणो तया ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078295 · अभंग क्र. २०५४

2054.
भाग्यवंत म्हणो तया । शरण गेले पंढरिराया ॥१॥
तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥धृपद॥
भुक्तीमुक्तीचे ते स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥२॥
गाइले पुराणी । तुका म्हणे वेदवाणी ॥३॥

अर्थ :
जे पंढरीरायाला शरण गेले त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. पंढरीरायाच्या नामाने मागेही पुष्कळ भक्त तरले आणि पुढेही तरतील यात संशय नाही. कारण नामधारक भक्तांची तशी प्रसिध्दीच आहे. भोळ्या भाविकांना नामसंकीर्तन हेच एक भोग-मोक्ष प्राप्त होण्याचे पवित्र क्षेत्र आहे. तुकाराम महाराज म्हणतात वेदांनी व पुराणांनी याची फार स्तुती केली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग