वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

जैसे चित्त जयावरी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077886 · अभंग क्र. २०५५

2055.
जैसे चित्त जयावरी । तैसे जवळी ते दुरी ॥१॥
न लगे द्यावा परिहार । या कोरडे उत्तर ।
असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥धृपद॥
अवघे जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥२॥
तुका म्हणे बुद्धि । ज्याची ते च तया शुद्धी ॥३॥

अर्थ :
ज्याची ज्या वस्तूविषयी जशा प्रकारची चित्तात समजूत असते त्याप्रमाणे त्याला ती वस्तू जवळ अथवा दूर होत असते ;म्हणूनच ' देव नाही ' अशी ज्याची समजूत झाली त्याला देव दूर आहे आणि ' देव आहे ' अशी समजूत असेल तर तो फार जवळ आहे. ' देव ' आहे यासंबंधी काही बोलायलाच नको. कारण नुसत्या कोरड्या बोलण्याने काय होणार आहे ? वस्तुस्थितीने पाहिले तर सर्वांच्या हृदयात ' मी दृष्टा आहे ' या रूपाने जे ज्ञान होते ते देवाचेच ज्ञान होय. त्यामुळे तो अगदी जवळ आहे. सर्वांच्या कर्माची सूत्रे ज्याच्या हातांत आहेत आणि कोणता जीव कसा नाचतो ;अहंकारारूढ होऊन कसे कर्म करतो हे सर्व जो पाहातो त्याला ' देव ' म्हणावे. तुकाराम महाराज म्हणतात सारांश जशी ज्याची सदोष वा निर्दोष बुध्दी असेल त्याप्रमाणे त्याला भ्रम - प्रेमात्मक ज्ञान होते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग