तत्त्वमसि वाक्य उपद
2057.
तत्त्वमसि वाक्य उपदेंशिले तुज | ते तू जीवी का अझून धरिसी दूर ॥ धृ॥त्रिभूवनापरता धांवतोसी दुरी | आधी तू आपुली शुद्धि करी |उदय अस्तु जाला कवणिये घरी | पिंडामाझारी पाहे पा ॥१॥
जागृतीमध्ये कवण जागते | दोही माजी स्वप्न कोण देखते |पुषप्तीमध्ये कोण नांदते | मग अनुवादते ते कवण ॥२॥
जागृती वरोनि करी चितन | सुषुप्तीमाजी रिघे ज्ञान |दोन्हींभाजी स्वप्न देखे कवण | जीव की मन सांग पा ॥३॥
निद्रा मरण हे एक स्थान | दोहींचा देखणा जाणे आपण |लहान सुईच्या इंधनाहून | आढळले मन पांचासी ॥४॥
इंद्रिये चपळ चेइली | जागत होती ती का परतली |जाऊनिया कवणा धरी लपाली | मना मिळाली कवणे गुणे ॥५॥
सांगता तेथे अनुवाद केंचा | नाही तूंपण खुंटली वाचा |विष्णुदास नामा वोळिला साचा | परमपदी बैसलासे ॥६॥
