वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

न लगे पाहावे अबद्ध व

🙏 3. संत तुकाराम · ABH-078093 · अभंग क्र. २०६२

2062.
न लगे पाहावे अबद्ध वाकडे । उच्चारावे कोडे नाम तुझे ॥१॥
नाही वेळ काळ पंडितांचा धाक । होत का वाचक वेदवक्ते ॥धृपद॥
पुराणी ही कोठे न मिळे पाहाता । तैशी या अनंता ठेवू नामे ॥२॥
आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करू छंद कथेकाळी ॥३॥
तुका म्हणे आम्ही आनंदेंचि धालो । आनंद चि ल्यालो अळंकार ॥४॥

अर्थ :
हे हरी तुझे नाम अबद्ध आहे की वाकडे आहे हे काहीच पाहण्याची गरज नाही केवळ आवडीने तुझे नाम उच्चारावे लागते. हरीचे नाम घेण्याकरता कोणत्याही प्रकारचा काळ किंवा वेळ लागत नाही आणि आपण नाम बरोबर घेतो की चुकीचे घेतो यासाठी पंडित लोकांचा धाकही नसतो आणि समोर कोणीही असो शास्त्री असो किंवा वेद वक्ता असो नाम घेणाऱ्याला त्याची भीती नसते. हरि प्रतिपादन जे वेदाने केले आहे ते तर कळून घेण्यासही सोपे नाही परंतु अशा हरीला आपण आपल्या योग्यतेनुसार आपल्याला सोपे जाईल असे वेगवेगळे प्रकारचे नावे आपण ठेवू. हरीकथेच्या वेळी जेणेकरून आपल्या मनामध्ये आनंद निर्माण होईल असे वेगवेगळे प्रकारचे छंद आपण करत जाऊ. तुकाराम महाराज आम्ही आनंदानेच तृप्त झालो आहोत आणि आनंदाचे अलंकार परिधान करत आहोत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग