वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ५. सार्थ अभंग २००१ ते २५००

भला भला पुंडलिका । म

🙏 3. संत तुकाराम · ABH-077940 · अभंग क्र. २०४०

2040.
भला भला पुंडलिका । मानलासी जनलोका ॥१॥
कोण्या काळे सुखा । ऐशा कोण पावत ॥२॥
नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥धृपद॥
अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥३॥
तुका म्हणे धन्य जाले । भूमी वैकुंठ आणिले ॥४॥

अर्थ :
हे पुंडलिका तु भला आहेस खूप चांगला आहेस सर्व संतसज्जनांनी लोकांनी तुला मान्यता दिली आहे सर्वांना तु मान्य झाला आहेस. अरे तु जर नसता तर कोणाला आणि कोणत्या काळी या हरीचे सुख असे प्राप्त झाले असते. ज्याला कोणीही आज पर्यंत जिंकू शकले नाही कोणालाही जो प्राप्त झाला नाही असा पांडुरंग तु विटेवर उभा केला आहेस. एवढेच नाही तर तु पांडुरंग रुक्माई सत्यभामा गरुड हनुमंत गोपी गोपाळ हा सर्व परिवारास पंढरीस आणला आहे. तुकाराम महाराज म्हणतात हे पुंडलिका वैकुंठच तु भूमीवर आणले आहे त्यामुळे सर्व भूमी धन्य झाली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग