वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

आणिकाची सेवा करावी श

🙏 3. संत तुकाराम · ABH-078893 · अभंग क्र. १४६७

1467.
आणिकाची सेवा करावी शरीरे । ती येथे उत्तरे कोरडींच ॥१॥
ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा याचकाच्या ॥धृपद॥
आणिकाचे देणे काळी पोट भरे । येथील न सरे कल्पांती ही ॥२॥
आणिकाचे भेटी आडकाठी पडे । येथे ते न घडे वचन ही ॥३॥
आणिके दंडिती चुकलिया सेवा । येथे सोस हेवा दोन्ही नाही ॥४॥
तुका म्हणे करी आपणासारिखे । उद्धरी पारिखे उंच निच ॥५॥

अर्थ :
इतर कोणाचीही सेवा करण्याचे ठरवले तर शरीराला कष्ट होते परंतु पांडुरंगाची सेवा केवळ शब्द स्तुतीने सेवा घडते असा हा पांडुरंग सहज व सुलभ आहे. तो आपल्या सेवकाला हेलपाटे घालायला लावत नाही हे. इतर कोणाची भेट घेण्यास गेलो तर अनेक काठ्या मध्ये येतात पण, पांडुरंगाची भेट घेण्यास गेलोच तर त्याला एक शब्दाची आडकाठी मध्ये येत नाही. इतर कोणीही वर (आशीर्वाद) दिला तर तो शाश्वत नसतो त्याने काही काळ पोट भरते पण तो टिकत नाही, परंतु पांडुरंगाने जर काही दिले तर ते कल्पांत झाला तरी संपत नाही. इतर कोणाचीही सेवा करताना काही चूक झाली तर ते दंड करतात परंतु पांडुरंगाची सेवा करताना भक्तांकडून काही चूक झाली झाली तरी त्याला तो कष्ट देत नाही आणि मुळात पांडुरंग सेवा घेण्याची इच्छाही करत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जो भक्त पांडुरंगाची भक्ती भावाने सेवा करतो मग तो उच्च असो की निच‌ असो पांडुरंग त्याला आपल्यासारखा करतो.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग