सदैव आवडे ज्या कीर्त
1448.
सदैव आवडे ज्या कीर्तन । धन्य पावन जगी ते ॥१॥
ब्रह्माचारी गृहस्थाश्रमीं । करिती कीर्तन निजधामीं ॥२॥
शुद्र अथवा अति निंद्य । कीर्तनी वंद्य सर्वथा ॥३॥
यवन मांतगादि जन । कीर्तनी पावन कलियुगीं ॥४॥
एका शरण जीवेंभावें । सदा कीर्तन करावे ॥५॥
