दुर्जनाची जाती । त्य
1468.
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडी पडे माती ॥१॥
त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥धृपद॥
पाहे संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥
उंच निच नाही । तुका म्हणे खळा काही ॥३॥
अर्थ :
वाईट वागणे ही दुर्जनाची जातच असते व वाईट वागण्यामुळे त्याच्या तोंडात माती पडत असते. त्या दुर्जनाची बुद्धीच त्याच्या हिताला आड येते कारण तो त्याच्या वाचेने काहीही अनुचित बडबड करतो. दुष्ट लोक हे संतांकडे दोष दृष्टीने पाहतात व त्यांची भीडभाड ते ठेवत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात मूर्खांना उंच नीच काहीच समजत नाही.
