खाती आपण जे जेविती ।
1460.
खाती आपण जे जेविती ।
तेचि आणिकाही वाढिती ॥१॥
आजि बहुता भाग्ये भेटी ।
झाली चरणी पडली मिठी ॥२॥
नाहीचि आम्हासी वंचिले ।
निज गुज अवघेचि आपुले ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
केले अनाथा सनाथ ॥४॥
1460.
खाती आपण जे जेविती ।
तेचि आणिकाही वाढिती ॥१॥
आजि बहुता भाग्ये भेटी ।
झाली चरणी पडली मिठी ॥२॥
नाहीचि आम्हासी वंचिले ।
निज गुज अवघेचि आपुले ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
केले अनाथा सनाथ ॥४॥