सांडोनि संसार जालो म
1444.
सांडोनि संसार जालो मी अंकित | ऐशियाचा अंत पाहू नको ॥१॥
पातकी मी सत्य पातकी मी सत्य | पातकी मी सत्य पांडुरंगा ॥२॥
माझे गुणदोष न धरिसी चित्ती | थोरपण ख्याति दावी आम्हा ॥३॥
ऐसा अपराध आणू नको मना | पंढरीच्या राणा म्हणे नामा ॥४॥
