हिरे जळामधी भिजतील क
1460.
हिरे जळामधी भिजतील कधी | तैसे कृपानिधी केले आम्हा ॥१॥
आमुचा विकल्प आमुचा विकल्प | आमुचा विकल्प आम्हा नाडी ॥२॥
कामधेनु संगे गाढव बांधिले | तयाचे ते मोले तुके केवि ॥३॥
काय म्या करावे पाठी लागे भोग | नामा म्हणे योग्य तुझ्या हाती ॥४॥
