तान मान सर्वथा । ते
1462.
तान मान सर्वथा । ते भजन न मने चित्ता ॥१॥
वेडेंवाकुडें तुमचे नाम । गाइन सदोदित प्रेम ॥२॥
वाचा करुनी सोंवळी । उच्चारीन नामावळी ॥३॥
नाम तारक हे जनी । व्यास बोलिले पुराणीं ॥४॥
एका जनार्दनी जप । सुलभ आम्हा विठ्ठल नाम देख ॥५॥
