एकचि नाम वाचे । श्री
1458.
एकचि नाम वाचे । श्रीरामाचे सर्वकाळ ॥१॥
पर्वत उल्लंघी पापाचे । नाम वाचे वदतांची ॥२॥
आवडी करिता कीर्तन । नासे भवाचें बंधन ॥३॥
श्रेष्ठ साधन कीर्तन । तेणे तोषें जनार्दन ॥४॥
एका जनार्दन कीर्तन । मना होय समाधान ॥५॥