वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

या हो या चला जाऊ कीर

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086017 · अभंग क्र. १४६०

1460.
या हो या चला जाऊ कीर्तना । आनंद तेणे मना नाचती वैष्णव ॥१॥
राम कृष्ण हरि वासुदेवा । गातती प्रेमभाव आवडी आदरे ॥२॥
सुख तेथे शांती विरक्ति कोण पुसे । सबाह्म अभ्यंतरीं अवघा वासुदेव वसे ॥३॥
एका जनार्दनी वासुदेवी मन । जन वन तेथे अवघा जनार्दन ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग