सर्वकाळ खंती वाटे ।
1446.
सर्वकाळ खंती वाटे ।
कै तो भेटे मज आता ॥१॥
न लोटे पळ युगा ऐसे ।
रात्री दिवसे सम झाली ॥२॥
करुणामुखे भाकी कीव ।
ये वो ये वो म्हणउनी ॥३॥
निळा म्हणे जाणवा मात ।
तुम्ही संत एकांती ॥४॥
1446.
सर्वकाळ खंती वाटे ।
कै तो भेटे मज आता ॥१॥
न लोटे पळ युगा ऐसे ।
रात्री दिवसे सम झाली ॥२॥
करुणामुखे भाकी कीव ।
ये वो ये वो म्हणउनी ॥३॥
निळा म्हणे जाणवा मात ।
तुम्ही संत एकांती ॥४॥