भजन भावाते उपजवी । द
1466.
भजन भावाते उपजवी । देव भक्तांतें निपजवी ॥१॥
ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥२॥
भक्ताकारणे हा संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥३॥
देव भक्ताचीये पोटी । जाला म्हणोनी आवड मोठी ॥४॥
एका जनार्दनी नवलावो । भक्ताचि कैसा जाला देवो ॥५॥
