वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

कायावाचामनें निग्रह

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085834 · अभंग क्र. १४५०

1450.
कायावाचामनें निग्रह करी । कीर्तन सर्व भावे ऐके निर्धारी । अष्टांग साधन न करी । सुखे करी कीर्तन ॥१॥
देव तुष्टेल तुष्टेल । सर्वभाव तुझा पुरवेल॥ध्रु॥
शांती क्षमा दया उन्मनी । आशा मनीषा तृष्णा दवडोनी । काम क्रोध मद लोभ बंदीखानी । घालीं नेउनी निर्धारे ॥२॥
सर्वांभुतीं समदृष्टी । पाहे सर्व एकमय सृष्टी । तरी ऐक्य कीर्तनगोठीं । परमानंदे आल्हाद ॥३॥
धरी संतांचा सांगात । कीर्तनी करी शुद्ध चित्त । एका जनार्दनी वचनार्थ । राम हरि गोविंदा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग