शरीराचा भाव तुज नाही
1457.
शरीराचा भाव तुज नाही देवा | तेथे मी केशवा काय बोलू ॥१॥
अंगदाचे अंगी बळ देसी फार | बहु उपकार कळो आले ॥२॥
तुम्हा नित्य न्याय नोव्हे साचपण | बळि तूते दान देउनि ठके ॥३॥
नामा म्हणे सदा काय म्या गान्हाणे | किती नारायणे देऊ आता ॥४॥
