तुजविण आम्हा कोण हो
1462.
तुजविण आम्हा कोण हो पोषिता | अहो जी कृपावंता पंढरिराया ॥१॥
न करी विठ्ठला आता लाजिरवाणे | मी तुझे पोसणे पांडुरंगा ॥२॥
काकुळती कोणा येऊ हो मी आता | अनाथाचे नाथा विठ्ठला तू ॥३॥
एक वेळ आता पाहे मजकडे | नामा म्हणे तेहे रंक तुझे ॥ | ४ ॥
