मागणें ते आम्ही मागू
1455.
मागणें ते आम्ही मागूं देवा । देई हेवा कीर्तनी ॥१॥
दुजा हेत नाही मनी । कीर्तनावांचुनी तुमचीया ॥२॥
प्रेमे हरिदास नाचत । कीर्तन होत गजरी ॥३॥
एका जनार्दनी कीर्तन । पावन होती चराचर जाण ॥४॥