जन्मल्यापासूनि सोशिल
1458.
जन्मल्यापासूनि सोशिले प्रवास | वियोग पहावया जाले आता ॥१॥
आता एक करी धावणिया धांवा | बुडतो केशवा काढी मज ॥२॥
लाभ नव्हे हानि जाली भागाभाग | तूंचि पांडुरंग पुरविसी ॥३॥
नामा म्हणे ऐसे सर्वस्व रक्षिले | पाषाण तारिले जळामाजी ॥४॥
