आपुले रूपी मज लपवी न
1447.
आपुले रूपी मज लपवी निरंतरीं| समाये भीतरी आड राहे ॥१॥
परि तुज मज असावा संवादु | भ्रांति मायाबाधु काय करी ॥२॥
काम क्रोध लोभ दंभ मद मछर हे वैरी अपार मारी माझे ॥३॥
नामा म्हणे आम्ही जन्माजन्मांतरींचे | पोसणे घरींचे सदा तुझे ॥४॥
