अंतरीचे मनोगत ।
1448.
अंतरीचे मनोगत ।
तुम्ही तो सतत जाणतसा ॥१॥
तरी वियोग नका आता ।
तुमच्या भजना भजनासी ॥२॥
आठव करिता दिवसरात्री ।
उल्हास चित्ती मना दयावा ॥३॥
निळा म्हणे कृपाघना ।
विज्ञापना हे माझी ॥४॥
1448.
अंतरीचे मनोगत ।
तुम्ही तो सतत जाणतसा ॥१॥
तरी वियोग नका आता ।
तुमच्या भजना भजनासी ॥२॥
आठव करिता दिवसरात्री ।
उल्हास चित्ती मना दयावा ॥३॥
निळा म्हणे कृपाघना ।
विज्ञापना हे माझी ॥४॥