भजन भावे गाऊ भजन भाव
1465.
भजन भावे गाऊ भजन भावे ध्याऊ । भजन भावे पाहू विठोबासी ॥१॥
भजन ते सोपे भजन ते सोपे । हरतील पापें जन्मांतरींची ॥२॥
घालूं तुळशीमाळा गोपीचंदन लल्लाटीं । देखता हिंपुटी यम पळे ॥३॥
सांडूंनियां आशा जालो वारकरी । एका जनार्दनी पंढरी पाहू डोळा ॥४॥
