संतकृपेने प्राप्त झा
1451.
संतकृपेने प्राप्त झालेल्या स्थिती-संबंधाने जनांपाशी व संतांपाशी उद्गार)
अवघ्याचि संपत्ती आलीया घरा ।
तुमचिया दातारा आगमने ॥१॥
शीतळ झालो पावन झालो ।
तुमचिया लागलो चरणांसी ॥२॥
धरिलीया जन्माचे सार्थक झाले ।
तुम्ही अवलोकिले म्हणोनिया ॥३॥
निळा म्हणे धरिले हाती ।
जेव्हाचि संती तुम्ही मज ॥४॥
