वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 185. नवविधा भक्ती श्रवण कीर्तन भाव भक्ती उद्गार

वत्साकारणे मोहाळु गा

🙏 4. संत नामदेव · ABH-082456 · अभंग क्र. १४४६

1446.
वत्साकारणे मोहाळु गाये | अनुसरलेया पान्हा ये ॥१॥
तैसे तुझे वासरू बांधलो मी असे | मज लावे कांसे आपुलिया ॥२॥
मज बांधले त्वा संसारखुंटी | माझी माउली दूर वैकुंठी ॥३॥
थोरू करी मना लाहो | तंव आणि नेती पान्हावो ॥४॥
धीरू नव्हे याचि परि | नामा विनवितसे मुरारी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग