वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 69. नामपाठ - अभंग १३७४ ते १७९१

जे पदींनिरुपण तेंचि

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086147 · अभंग क्र. १४४७

1447.
जे पदींनिरुपण तेंचि हृदयी ध्यान । तेथे सहजीं स्थिर राहे मन ।
कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥
कीर्तने सिद्धि कीर्तने सिद्धि । कीर्तने समाधान बुद्धी ।
कीर्तनी विनटले नारद प्रल्हाद । द्वंद्वामाजीं समाधी रे ॥२॥
कीर्त्नीं सद्भाव अखंड अहर्निशी । पाप नरिघे त्याच्या देशी ।
निजनामे निष्पाप अंतर देखोनीं देव तिष्ठे तयापशीं रे ॥३॥
हरिनम कीर्तने अभिमान सरे । आणिक श्रेष्ठ आहे काज ।
सद्भावें कीर्तनी गाता पै नाचतां । लोकेषणा सांडी लाज रे ॥४॥
कलीमाजी कीर्तन श्रेष्ठ पै साधन । साच अन मानी ज्यांचे मन ।
नामासी विन्मुख जन्म त्यसी दुःख । त्या केवि होय समाधान रे ॥५॥
कीर्तानाचेनि पंथे लाजविलीं तीर्थे । जप तपासे केले मुक्त ।
हरिनामे लोधला देवाधि देवो । वैकुंठचि केले तेथे रे ॥६॥
व्रतां तपां तीर्थों न भेटे जो पाहता । तो कीर्तनी सांपडे देवो ।
तनु मन प्राणें कीर्तनी विनटले । भावा विकला वासुदेवो रे ॥७॥
एका जनार्दनी कीर्तन भावे । श्रोता वक्ता ऐसे लाहावें ।
गर्जत नामे निशाण लागुनि । सकळिका वैकुंठासी जावे रे ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग