ऐकतो दाट । आले एकाचे
1466.
ऐकतो दाट । आले एकाचे बोभाट ॥१॥
नका विश्वासो यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥धृपद॥
हेचि यांची जोडी । सदा बोडकी उघडी ॥२॥
तुका म्हणे न्यावे । ज्याचे त्यासी नाही ठावे ॥३॥
अर्थ :
वैष्णव हे चोरटे आहेत याबद्दल मी पुष्कळ लोकांची गाऱ्हाणी ऐकली आहे. त्यामुळे वैष्णवांवर विश्वास ठेवून नका कारण वैष्णव देहाचा देहभाव नष्ट करणारे चोर आहेत. चोरी करणे हा वैष्णवाचा धंदा असून ते नेहमी असंग असतात. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवांनी काही चोरून नेले तर ज्याचा माल चोरून नेला त्याला देखील ते त्याचा पत्ता लागू देत नाहीत.
