विठ्ठल विद्गदे पुंडल
1449.
विठ्ठल विद्गदे पुंडलिकवरदे| अनंत अभेदे नामे तुझी ॥१॥
पाव गे विठ्ठले मजलागी झडकरी बुडतो भवसागरी काढी मज ॥२॥
आकांत अवसरी स्मरले साच| दीनानाये बीदे सत्य केली ॥३॥
स्मरली संकटी द्रौपदी वनवासी | धांवोनि आलासि लवडसवडी ॥४॥
प्रल्हादे तुजलागी स्मरिले निर्वाणी | संकटापासोनि राखियेले ॥५॥
नामा म्हणे थोर पीडिलो गर्भवासे | अखंड पाहातसे वास तुझी ॥६॥
