नव्हती माझे फुकट बोल
1464.
नव्हती माझे फुकट बोल ।
जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥
संतकृपेची हे जाती ।
ओघेंचि चालती अक्षरे ॥२॥
कैची मती बोलावया ।
ठायींचि पाया विदित ते ॥३॥
निळा म्हणे बाहेरी आले ।
होते सांठविले ह्रदयी जे ॥४॥
1464.
नव्हती माझे फुकट बोल ।
जाणे विठ्ठल सत्य मिथ्या ॥१॥
संतकृपेची हे जाती ।
ओघेंचि चालती अक्षरे ॥२॥
कैची मती बोलावया ।
ठायींचि पाया विदित ते ॥३॥
निळा म्हणे बाहेरी आले ।
होते सांठविले ह्रदयी जे ॥४॥