न वजो यावरी आता कोठे
1465.
न वजो यावरी आता कोठे ।
सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥
जोडले ते भाग्ययोगे ।
येणे काळे संतसंगे ॥२॥
दुभिन्नले वरुषोनी वरी ।
प्रेमअमृताच्या धारी ॥३॥
निळा म्हणोनी सांठी ।
केली जिवे देउनी मिठी ॥४॥
1465.
न वजो यावरी आता कोठे ।
सांडुनि चरण हे गोमटे ॥१॥
जोडले ते भाग्ययोगे ।
येणे काळे संतसंगे ॥२॥
दुभिन्नले वरुषोनी वरी ।
प्रेमअमृताच्या धारी ॥३॥
निळा म्हणोनी सांठी ।
केली जिवे देउनी मिठी ॥४॥