मुंगीचिया गळा बांधोन
1448.
मुंगीचिया गळा बांधोनिया मेरू | तेणे हा प्रकारू कळो आला ॥१॥
माळियाचे पोरे लपविले पोटी | तेणे जगजेठी सुख मानी ॥२॥
कुलालाचे हाती तुडविले मूल दाखवी नवल तयासाठी ॥३॥
मजसाठी काय धरियेले मौना | धांव नारायणा नामा म्हणे ॥४॥