विश्वंभर नाम तुझे कम
1456.
विश्वंभर नाम तुझे कमळापती | जगी श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥
गौळिया घरींचे दही लोणी चोरूनी | खाता चक्रपाणि लाजसी ना ॥२॥
आता दीनानाथा तुझे ब्रीद साचे तरी भूषण आमुचे जतन करी ॥३॥
येर ठेवाठेवी कायसी आता | तुम्हा विनवितो नामा केशिराजा ॥४॥
