वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

जरी जाला भाग्यवंत ।

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075908 · अभंग क्र. ३२०

320.
जरी जाला भाग्यवंत ।
धनधान्यसंपन्न अद्भुत ।
भगवंती नव्हे जयाचे चित्त ।
तरी तो यथार्थ सुतकी ॥१॥
न वजावे तयाचे घरा ।
नातळावे घरदारा ।
जळो त्याचे द्रव्यदारा ।
पापी खरा सुतकी ॥२॥
कन्यापुत्र कनकसंपन्न ।
सोयरेधारे धनवंत जाण ।
भगवंती जयाचे विमुखपण ।
तरी तो जाणा सुतकी ॥३॥
जरी जाले वेदज्ञ पंडित ।
शास्त्राभ्यासी तत्त्वार्थ ।
भगवंती नसे जयाचे चित्त ।
तरी तो यथार्थ सुतकी ॥४॥
जरी झाले ज्ञानी आणि महानुभाव ।
पूर्णपणे जरी देखिला देव ।
नामपाठी जयाचा अभाव ।
तरी त्या नाव सुतकी ॥५॥
बहेणि म्हणे निवृत्ति कारण ।
नाम-पाठी ठेविले मन ।
हरावया देहदोष जाण ।
हरिकीर्तन करिते ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग