वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

नाही ते तू काय गिळीस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074762 · अभंग क्र. ३१५

315.
नाही ते तू काय गिळीसी ।
आत्मा वोळखोनी होय तत्त्वमसी ॥
सांडी सांडी सगुणाची भ्रांतीसी ।
तुंचि निर्गुण आहासी तत्त्वमसी ॥
रखुमादेविवरु विठ्ठलु पंढरीयेसी ।
कांही न व्हावा अवघा होसी ॥

अर्थ :
तू पंचाग्नी साधन करुन धूराचे घोट का घेत बसला आहेस त्याचा एक उपयोग नाही उलट तत्त्वमसि महावाक्योपदेशाने आत्म्यास ओळखुन घे. याप्रमाणे ब्रह्मज्ञान करुन घेऊन परमात्म्याचे सगुण स्वरुपराविषयीची भ्रांती टाकून दे. अरे तत्त्वमसि महावाक्यांनी सांगितलेले निर्गुण ब्रह्म स्वतः तुच आहेस. याचा अर्थ रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते मीच आहे असा तुझा निश्चय होईल म्हणजे तुझ्यामध्ये व परमात्म्यामध्ये भेद राहाणार नाही असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग