गोरे सांवळे घनवटे |
316.
गोरे सांवळे घनवटे | एक चालती एकापुढे ॥१॥
राम निळीय गुढारी | कनकदंड चौरेवरी ॥२॥
|राम लक्ष्मण विजयी जाले | आनंदे अयोध्ये आले ॥३॥
चंद्रगिरीचे तळवटी | राम सीतेसी जाली भेटी ॥४॥
चंद्रगिरी चला भाऊ | राम दादरयी पाहू ॥५॥
चंद्रगिरी केला वास | म्हणे नामा विष्णुदास ॥६॥
