वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

नलगे घ्यावे सोंग टोप

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076213 · अभंग क्र. ३२२

322.
नलगे घ्यावे सोंग टोपी-मुद्रा धरणे ।
भक्ति ही कारण असो द्यावी ॥१॥
तेथे सर्व सिद्धि नांदती स्वभावे ।
आपुलाल्या दैवे घ्यावे येथे ॥२॥
नलगे योगायोग नलगे भोगत्याग ।
असावा अनुराग भक्तिसवे ॥३॥
नलगे जप तप दान तीर्थाटणे ।
भक्ति असो देणे येक गाठी ॥४॥
नलगे ज्ञान ध्यान नग्न पै हिंडण ।
भक्ति हे कारण असो द्यावी ॥५॥
बहेणि म्हणे आह्मा भक्ती तेचि मुक्ति ।
ऐशा वेदश्रुति गर्जताती ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग