वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

कीटक-भृंगी-न्याये ला

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076136 · अभंग क्र. ३१२

312.
कीटक-भृंगी-न्याये लागे जे धारणा ।
तोचि एक जाण ब्रह्मनिष्ठ ॥१॥
एर्‍हवी ते बोल बोलावे फुकाचे ।
काय सांगीवेचे शब्दज्ञान ॥२॥
चकोर-चंद्र-न्याये जै होय हे मन ।
तरी संतपदज्ञान सत्य जाणा ॥३॥
बहेणि म्हणे सिंधुलवण-न्याय-भेटी ।
घडे तेव्हा गोष्टी ब्रह्मत्वाची ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग