म्हणसी बिभीषण शाहणा
317.
म्हणसी बिभीषण शाहणा | परि तो महामूर्ख जाणा ॥१॥
काय तो रामासी भेटला | आवघा रामचि नाही जाला ॥२॥
राम दृष्टी देखतांची | पदवी न घेववेचि त्याची ॥३॥
कोण हित केले तेणे | राम नाकळी चिंतने ॥४॥
जरी तो जाला लंकापती | नाश पावेल कल्पांती ॥५॥
नामया स्वामीते जाणोन | अवघा रामचि होईन ॥६॥
