जे मन गांजले विषयाचे
319.
जे मन गांजले विषयाचे पोखे । ते केले पारखे कृपा दृष्टी ॥१॥
काम आणि क्रोध जे जीवे मारिले । दंभ मान केले दूर देशी ॥२॥
आशा आणि ममता दवडिली चिंता । नाही भय आता संसाराचे ॥३॥
चोखा म्हणे अवघा संदेह फिटला । उपकार हा केला नामयानें॥ ॥४॥
