नव्हे करणीची आहाच ।
318.
नव्हे करणीची आहाच ।
जीवे पायी जडलो साच ॥१॥
आता टाकिले करावे ।
शरण केशवासी जावे ॥२॥
देउनी प्रपंचासी काटी ।
पाय तुझे धरिले कंठी ॥३॥
वैरी गांजिती छळिती ।
परी हे तुझे पाय चित्ती ॥४॥
नखी देती जरी सुया ।
तुज न सोडी देवराया ॥५॥
जरी केलासी साहाकारी ।
बहेणि म्हणे दया करी ॥६॥
