वेष धरोनी ब्राम्हण ।
315.
वेष धरोनी ब्राम्हण । तिसी करी संभाषण ॥1॥
खेद न करी मानसी । काय करणे होणारासी ॥2॥
वेगी संस्कारी याला । दिवसा मागती जा कामाला ॥3॥
घेऊनिया प्रेतासी । वेगी चेतवी अग्नीसी ॥4॥
ज्वाळा अवलोकिता नयनी । राव आला तत्क्षणी ॥5॥
म्हणे कोण गे तू येथे । येरी म्हणे तुमचा सुत ॥6॥
कैचा सुत कैसा काय । आमचा हक कोठे आहे ॥7॥
करुणा ग्लानी करी त्याची । म्हणे गोष्ट हे तो कैची ॥8॥
बरेपणे जांई आता । दंड बैसतलि माथा ॥9॥
घेई प्रेत ओसंगळी । वेगे प्रवेशे देउळी ॥10॥
आडवे प्रेत झोपी जाय । ऋषि धावे लवलाहे ॥11॥
उदर चिरोनिया नखी । मांस कवळे घाली मुखी ॥12॥
येऊनिया नगरनारी । जनी म्हणे शंख करी ॥13॥
