वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

आणिका उपदेश सांगे बर

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076161 · अभंग क्र. ३१६

316.
आणिका उपदेश सांगे बरव्या रीती ।
आपण तो चित्ती न धरी काही ॥१॥
ऐसे ते जाणावे मतिमंद हीन ।
तया ब्रह्मज्ञान काय करी ॥२॥
वरवर लोका सांगे ब्रह्मज्ञान ।
आपण तैसे जाण न धरी चित्ती ॥३॥
बहेणि म्हणे तया नाही आत्मशुद्धि ।
येरा सांगे बुद्धि मूर्खपणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग