वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ८, उपदेश > अभंग १८९ ते ३२५

पाहणेचि पाहासी काय ।

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074809 · अभंग क्र. ३१६

316.
पाहणेचि पाहासी काय ।
पाहणे तेथे नाही ।
पाहणेची पाही ।
पाहणे रया ॥
खुटले बोलणे बोली बोला ।
बोलुचि मौन्य ठेला मौन्यामाजी ॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाचिये खुणे ।
अनुभविया बोलणे पारुषले ॥

अर्थ :
घटपटादि अनात्म दृश्य पदार्थ काय पाहत बसला आहेस. पदार्थात पाहणे म्हणजे आत्मा नाही. याकरिता दृश्य पदार्थ पाहाण्याचे टाकून दे पाहण्यास योग्य असा आत्माच पहा. आत्मा च पाहिलास म्हणजे आत्मज्ञान झाले, तर त्या ठिकाणी बोलणे खुंटते. म्हणजे शब्द मावळतो. त्या बोलण्याचे मौन निःशब्द आत्म्याच्या ठिकाणी होते. रखुमादेवीचे पती माझे पिता श्री विठ्ठल, त्याला पाहण्याची म्हणजे अनुभवण्याची खूण श्रीगुरुकृपेने प्राप्त होऊन बोलणेच खुंटुन जाते, असे माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग