जेथे वाजविला वेणु शु
319.
जेथे वाजविला वेणु शुद्ध । म्हणोनि म्हणती वेणुनाद ॥१॥
सकळीक देव आले । ते भोंवती राहिले ॥२॥
जोडिले जेथे समपद । तया म्हणती विष्णूपद ॥३॥
भोवंतालीं पदें उमटली । तेथे गोपाळ नाचती ॥४॥
जेथे उभे गाईचें भार । ते अद्यापि दिसत खुर ॥५॥
गोपाळांची पदें समग्र । ठाई शोभते सर्वत्र ॥६॥
एका जर्नादनी हरी शोभले । कार कटावरी ठेऊनि भले ॥७॥
