वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 135. श्री विठ्ठल महात्म्य

निर्विकल्प निराकारू

🙏 4. संत नामदेव · ABH-083098 · अभंग क्र. ३२१

321.
निर्विकल्प निराकारू |निःशून्य निराधारू| निर्गुण अपरंपारू | चिदानंद सांवळे ॥१॥
तया पुंडलिकासाठी | येऊनि उभे वाळवंटी |दोन्ही कर ठेवूनि कटी | प्रसन्न द्रुष्टी पाहातसे ॥२॥
म्हणऊनि उठा घ्या रे वाट | ठाका पंढरी वैकुंठ | येर वाउगे काय कष्ट |ब्रह्मी भेट पंढरीये ॥३॥
मूळग्राम मायापूर | पडिले भूतग्रामाचार |म्हणऊनि कर जघनावर | उभा राहूनि दावितसे ॥४॥
विठ्ठल नाम ह्रॄदयी धरा | हाचि उतार पैलपारा |मग नाही येरझारा | शंभू कुमरा सांगतसे ॥५॥
भेटी चौघे मुरडले |अठरा धांवता भागले |पंथी साही भांडले | ते अद्यापि बुझले नाही ॥६॥
जो सहस्रामाजी न दिसे | चोविसांत न भासे |दो सहस्त्र अनारिसे | पाहता अरे न दिसेचि ॥७॥
लय लक्ष लावूनि समाधि | योगिया हेचि ऊपाधि |उघडा डोळा प्रेमपदी | रे विठोजी न्याहाळा ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग